महाराष्ट्रातील प्रमुख संग्रहालये


1] मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.जुने नाव प्रिन्स अॉफ वेल्स म्युझियम. भारतात प्रथमच अॉडियो गाईड (स्वयंचलित वाटाड्या) ची सोय येथे करण्यात आली आहे. मातोश्री जिजामाता उद्यानाच्या परिसरातील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय. मुंबई नँचरल हिर्ट्री सोसायटी. नेहरू सायन्स सेंटर- विज्ञानविषयक कायमस्वरूपी प्रदर्शन. नेहरू सेंटर: जवाहरलाल नेहरूंचे सुप्रसिद्ध पुस्तक भारताचा शोध यावर आधारित. मणिभवन: महात्मा गांधीनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह.विक्रांत या निवृत्त झालेल्या विमानवाहू युध्द नौकेवर आरमारी परंपरेचे दर्शन घडविणारे संग्रहालय.

2] न्हावा : मुंबईजवळील प्रसिद्ध बंदर. येथे १९१२ साली सागरी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली.

3] डेरवण - येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी या संग्रहालयात शिवाजी महाराजांचे स्फृर्तीदायक चरित्र अनेक शिल्पांद्वारे साकारण्यात आले आहे.

4] अहमदनगर : ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. तसेच संरक्षण खात्यातर्फे रणगाड्यांचे भव्य संग्रहालय.

5] शिर्डी: श्री साईबाबांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू व त्यांच्या छायाचित्रांचे वस्तुसंग्रहालय.

6] नाशिक - पांडव लेण्यांच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या दादासाहेब फाळके स्मारकात चित्रपट सृष्टीची प्रगती दर्शविणारे संग्रहालय ., अंजनेरी: प्राचीन काळापासूनच्या नाण्यांचे संग्रहालय नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर., सिन्नर: श्री.के.सी. पांडे यांनी दोन कोटी रूपये खर्च करून स्थापन केलेले देशातील पहिले गारगोटी संग्रहालय. यात गारगोट्यापासून अनेक कलात्मक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

7] पुणे : राजा केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय, गायकवाड वाड्यात लोकमान्य टिळकांचे चित्रमय दर्शन, सारस बागेत गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन, टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या टाटा उद्योगाच्या विकासाचे दर्शन घडविणारे कायमस्वरूपी संग्रहालय. कात्रज येथील सर्पोद्द्यान. सिम्बायोसिसमध्ये विश्वभवन इमारतीत आफ्रो आशियायी संस्कृतीचे कायमस्वरूपी प्रदर्शन. प्रवेशद्वारात आर.के लक्ष्मणच्या कॉमनमँन चा पुतळा.

8] सातारा : महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्यातर्फे वस्तुसंग्रहालय.

9] सांगली : येथील जुन्या किल्ल्यातील ऐतिहासिक वस्तूंचे व चित्रांचे प्रदर्शन.

10] कोल्हापूर : टाऊन हॉल व न्यु पँलेसमधील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय.

11] अक्कलकोट: येथील किल्ल्यातील ऐतिहासिक शस्त्रागाराचे प्रदर्शन.

12] वेळापूर : ता. माळशिरस, जि. सोलापूर पुरातत्व खात्याचे मूर्ती संग्रहालय.

13] औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तु संग्रहालय. सोनेरी महालमधील महाराष्ट्र शासनाचे पुराण वस्तुसंग्रहालय. केंद्रीय पुरातत्व खात्याचे बिबीका मकबरा परिसरातील संग्रहालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऐतिहासिक संग्रहालय.

14] पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या परिसरातील बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालय.

15] तेर : श्री रामलिंगआप्पा लामतुरे यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह.

16] माहूर: राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाचे संग्रहालय.

17] चिखलदरा: वाघासंबंधीचे महाराष्ट्रातील एकमेव संग्रहालय.

18] नागपूर : राज्य शासनाचे पुरातत्व विभागाचे संग्रहालय. कामठी येथे ड्र्यागन पँलेसमधील संग्रहालय..

Post sender - rajanjadhav660.rj@gmail.com

0 Response to "महाराष्ट्रातील प्रमुख संग्रहालये"

Post a Comment

Thanks for your valuable feedback.... We will review wait 1 to 2 week 🙏✅

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel