दिलीप वळसे पाटील | Dilip Walse Patil new home minister of maharashtra


New home minister of maharashtra - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

 दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिली जाऊ शकते.

अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे. 

महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळाची बनत असताना दिलीप वळसे पाटील गृहमंत्री पदाचे प्रथम दावेदार होते. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी त्यावेळी जबाबदारी घेतली नाही. 

दिलीप वळसे पाटील यांनी याआधी  कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखे अशा महत्त्वाच्या मंत्रीपदांची जबाबदारी सांभाळली आहे. दिलीप वळसे पाटील 1990 पासून सलग सात वेळा विधानसभा सदस्य आहेत. दिपील वळसे पाटील यांनी  2009 ते 2014 या कालखंडात विधानसभेचे अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.  

 Comments if more que - Maharashtra home minister resignation Anil Desh mukh Resigns Param Bir Letter Investigation Row Param Bir Letter Investigation anil desh mukhdilip walse-patil Maharashtra Home Minister anil deshmukh resignation  Maharashtra News Home mnister





0 Response to "दिलीप वळसे पाटील | Dilip Walse Patil new home minister of maharashtra "

Post a Comment

Thanks for your valuable feedback.... We will review wait 1 to 2 week 🙏✅

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel